ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सगणापूरात नवविवाहित दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

7 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एक महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावासह कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशिष रमेश धानोरकर (वय 24) व त्यांची पत्नी करिष्मा आशिष धानोरकर (वय 19), रा. सगणापूर यांनी हिवारी मार्गालगत नवरगाव शिवारातील एका शेतातील विहिरीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास दोघांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आले.विशेष म्हणजे, या दाम्पत्याचा विवाह अवघ्या एक महिन्यापूर्वीच झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या दाम्पत्याच्या अकाली निधनाने गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कारणाबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.मृत आशिष धानोरकर यांच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

या घटनेमुळे धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण सगणापूर गाव शोकसागरात बुडाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर