ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

रेशीम उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण संपन्न

466 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात रेशीम उद्योग वाढीस लागून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत सुरू व्हावा या उद्देशाने तालुका कृषि अधिकारी कार्यालयात रेशीम उत्पादन उद्योगाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

शासनाच्या म ग्रा रो ह यो योजनेअंतर्गत रेशीम उद्योगाकरिता अनुदान उपलब्ध असून या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा व रेशीम उद्योग वाढीस लागावा या करिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
रेशीम विकास कार्यालय, यवतमाळ च्या रेशीम अधिकारी संगीता मुकरने यांनी तुती लागवड , शेड बांधकाम, रेशीम कीटक संगोपन याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

Maregaon: With the growth of the silk industry in the taluka, detailed training on the silk production industry was provided at the Taluka Agriculture Officer’s office with the aim of providing an additional source of income to the farmers.

तसेच तालुका कृषि अधिकारी मारेगाव दिपाली खवले यांनी रेशीम उद्योगाकरिता असलेल्या शासकीय योजना, अनुदान व रेशीम उद्योगाचे अर्थसहाय्य याविषयी शेतकऱ्यांना संबोधित केले.प्रशिक्षण संपताच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले व बऱ्याच शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन रेशीम उद्योग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.


शासकीय योजने अंतर्गत अनुदानावर तुती लागवड करून रेशीम उद्योग सुरू करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुढे यावे व शेतीत शाश्वतता आणून आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे व आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर