ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीत डॉ. संतोष डाखरे यांचा विजय.

156 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने विविध प्राधिकरणाकरिता नुकत्याच निवडणुका पार पडल्यात. यामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील रहिवासी प्रा. डॉ. संतोष डाखरे हे बहुमताने विजयी झालेत.

डॉ.संतोष डाखरे हे स्तंभलेखक तथा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचित असून विविध वृत्तपत्रातून ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावर सातत्याने लिखाण करीत असतात. मागील वर्षी त्यांचे कोरोना कालावधीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणारे लक्षवेध नामक पुस्तक महान समाजसेवी दांपत्य डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाताई आमटे यांच्याहस्ते प्रकाशित झाले होते.

डॉ. संतोष डाखरे यांनी त्यांच्या विजयामध्ये सहभागी सर्वांचे आभार मानले असून पुढील पाच वर्ष अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्र विषयाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
डॉ. डाखरे हे गडचिरोली जिल्यातील राजे विश्वेश्वरराव कला- वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर