ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

गोंडबुरांडा शाळा तालुक्यात प्रथम

143 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

मारेगाव तालुका प्रतिनिधी:-प्रमोद रा.मेश्राम ,

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राबविण्यात आलेल्या उपक्रमाअंतर्गत श्री दर्शन भारती विद्यालय गोंड बुरांडा या शाळेने मारेगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.

तालुक्यातील शाळा या स्वच्छ आणि सुंदर असाव्यात.शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्वचतेचे धडे मिळावे यासाठी राज्यशासनातर्फे तालुका स्तरावरून स्वच्छ आणि सुंदर शाळा हा उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी शाळा,शाळेचा परिसर,शाळेमध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम,शाळेचा दर्जा या सर्व बाबी तपासण्यात येतात.

सर्वप्रथम केंद्र स्तरावर आणि नंतर तालुका स्तरावर याचे मूल्यांकन केले गेले.यात केंद्र स्तरावर केंद्र प्रमुख प्रदीप रामटेके यांनी परीक्षण केले.तर तालुका स्तरावर गटशिक्षण अधिकारी स्नेहदीप काटकर यांनी परीक्षण केले.यात श्री दर्शन भारती विद्यालय गोंड बुरांडा या शाळेचा प्रथम क्रमांक आला.

दर्शनभारती ही शाळा आदिवासी गावामध्ये आणि पेसा अंतर्गत येते.आता ही शाळा जिल्हास्तर परीक्षणासाठी पात्र झाली असून दि.14 सप्टेंबरला हे मूल्यांकन करण्यात आले.यात शिक्षणाधिकारी किशोर पागोरे,उपशिक्षणाधिकारी राजू मडावी,धम्मरत्न वायवळ,अधिव्याख्याता डाएट,विस्तार अधिकारी ( शिक्षण प्राथमिक ) श्रीधर कनाके यांचा सामावेश होता.

शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुनील आष्टकर,संजय बाबाराव मोघे,दिलीप बाबुरावजी तेलंग,अविनाश परशरामजी तोडासे,किशोर पाथोडे,नागोराव ठाकरे नामदेवराव तोड़ासे,माजी विद्यार्थी,पालक वृंद, ग्रामवासी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.मुख्याध्यापक सुनील आष्टकर यांनी शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर