ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

वयाच्या अवघ्या ७ वर्षात मनस्वीने गाठले सुवर्ण पदकांचे शतक

269 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मुळगाव बोटोणी येथील कु.मनस्वी विशाल पिंपरे वय ७ वर्ष ,सध्या राहणार कोंढवा बु ,पुणे हि एक आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाळू व जागतिक विक्रमवीर आहे.

मनस्वीने ३ वर्ष ६ महिन्याची असताना स्केटिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ०९ ऑक्टोम्बर २०२१ रोजी पहिली राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविले,त्यांनतर अवघ्या ३ वर्षाच्या  कालावधीत तिने १ आंतरराष्ट्रीय,११ राष्ट्रीय ,१२ राजस्तरीय आणि ६५ जिल्हास्तरातीय स्केटिंग चॅम्पियनशीप मधुन एकूण १०० सुवर्ण पदके , १४ रजत पदके आणि १२ कांस्य पदके मिळविली आहे.

संपूर्ण भारतातील मनस्वी हि पहिलीच खेळाळू असेल जिने इतक्या कमी वयात व कमी कालावधीत १०० सुवर्ण पदके मिळवली असेल. लवकरच मनस्वीच्या या अनोख्या विक्रमाची नोंद केली जाणार आहे. या अगोदर सुद्धा मनस्वीणे वयाच्या ४ थ्या वर्षी मालदीव येथे आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण पदके मिळवली.वयाच्या ५व्या वर्षी ५० मीटर फायर लिंबो स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड , वयाच्या ६व्या वर्षी उभ्या मोबाईल एवढ्या उंची (१६.५) खालून जाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी जगातील सर्वात लहान मुलगी आणि नॅशनल स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासाठी कांस्य पदक मिळविले.

आणि ७व्या वर्षी १०० सुवर्ण पदकाचं एक नवा विक्रम करणार. हे सर्व विक्रम करण्यासाठी मनस्वीने अथक परिश्रम घेतले असुन तिचे स्केटिंग प्रशिक्षक विजय मलजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मनस्वी सध्या रॉक ऑन व्हील स्केतींग अकॅडमी कात्रज येथे स्केटिंगचे प्रशिक्षण घेत असून मारुती बधे मेमोरिअल स्कूल येथे शिकत आहे. तिचे पालक मनस्वीच्या स्केटिंग सोबत तिच्या सरावा वर विशेष लक्ष देतात , तिने केलेल्या या अनोख्या विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर