ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पांढरकवडा (ल)येथील शेतकरी पुत्राची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
मो. [9922862184]

मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (ल)येथील सुमारे 28 वर्षीय शेतकरी पुत्रानी कीटकनाशक प्राशन केल्याची घटना दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.

पांढरकवडा (ल)येथील सुधीर रवींद्र गोलर वय सुमारे 28 वर्ष असे आत्महत्या केलेल्या अविवाहीत शेतकरी पुत्राचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार सुधीर यांने दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात विषारी मोनोशिल नावाचे किटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्यांची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान आज दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोज मंगळवारला दुपारच्या सुमारास चंद्रपूर येथे सुधीरची प्राणज्योत मालवल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याची मौजा.पांढरकवडा (ल) येथे सामायिक शेती आहे. तो शेती करून आपली आई व लहान भाऊ यांच्यासोबत राहत होता.

सुधीर हा अविवाहित होता. तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सतत होत असलेली नापिकी आणि यावर्षीचा दुष्काळ यामुळे आर्थिकदृष्ट्या तो खचलेला होता. अशातच सुधीरने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे. त्याच्यामागे वृद्ध आई, व एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

सततच्या आत्महत्या तालुक्याला चटका लावून जात आहेत एवढे मात्र नक्की.
ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर