ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव मैत्री कट्टा तर्फे महिला दिन सांस्कृतिक रॅली ने लक्ष वेधले.

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महिला नृत्य स्पर्धेला अभिनव प्रतिसाद.

गजानन आसुटकर मारेगाव:-येथील मैत्री कट्टा ग्रुप द्वारा महिला दिनानिमित्त दिनांक 11व 12 मार्च 2023 ला आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक रॅली ने अवघ्या शहरवासीयांचे लक्ष वेधले. खास महिलांसाठी आयोजित नृत्य स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

40 वर्षापूर्वी रंगमंच गाजविणाऱ्या मारेगाव येथील युवक – युवतींनी कालांतराने मैत्री कट्टा ची पुन्हा एकदा स्थापना केली. या मंडळींनी मारेगावातील सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. गत दोन वर्षांपासून हे मैत्री कट्टा ग्रुप महिला दिनानिमीत्ताने भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.यावेळी शहरातून महिलांची रॅली काढण्यात आली.

यात आदिवासी नृत्य,लेझिम पथक,राजस्थानी गरबा,भांगडा न्रुत्य, कराटे पथक,भजन मंडळ आदी देखावे सादर करण्यात आले.खास महिलांचे हिरकणी ढोल ताशा पथक यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. हिरकणी ढोल पथकाची उभारणी करण्यात विशेष सहकार्या करिता रुपेशजी चौधरी तसेच व्हिकी जुमनाके यांना सन्मानीत करण्यात आले.

ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मार्गक्रमण करीत संपुर्ण शहरभर निघाली होती.दुसऱ्या दिवशी खास महिलांसाठी एकल व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली.यात महिलांची भरगच्च उपस्थिती होती.एकल नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रियांका घाने हिला मिळाला.द्वितीय पुरस्कार प्रियांका ढवळे व सोनल भांसे यांना देण्यात आला.राणी गाणार ही तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली.

जयश्री कल्लेवार हिला प्रोत्साहन पुरस्कार मिळाला.समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार जय अंबे ग्रुप,द्वितीय शिव तांडव ग्रुप,तृतीय शक्ती ग्रुप तर उतेजनार्थ पुरस्कार नारीशक्ती ग्रुप ला मिळाला.कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी मैत्री कट्टा ग्रुप चे दिपक जुनेजा,बिना हेपट (दुपारे),प्रतिभा डाखरे,उदय रायपूरे,किशोर पाटील,खालिद पटेल,आदिनी परिश्रम घेतले.गणेश पावशेरे,गजानन जयस्वाल,मिलिंद डोहने, सुनील भेले,शहाबुद्दीन अजानी,नर्गिस जिवानी,संजय साठे, दुष्यंत जैस्वाल ,शैलजा ठानेकर वनमाला आडकिने,व मंजुषा भगत आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर