ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भरधाव पिकपचा टायर फुटल्यामुळे दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार

116 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील गोविंद कोटेक्स समोरील घटना

सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,

मारेगावकडून करंजीकडे जात असलेल्या भरधाव पिकपचा टायर फुटल्यामुळे पिकअप एका दुचाकीला धडकली.यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गोविंद राजा कोटेक्स जवळ घडली असुन ही घटणा आज दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी शुक्रवारला रात्री ८:३० वाजताचे दरम्यान घडली.

रवींद्र हरिदास कोरझरे वय अंदाजे ३५ वर्ष रा.सालेभट्टी ता.मारेगाव असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वार व्यक्तीचे नाव आहे.तो नरसाळा येथील खदान येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.दिवसभर ट्रकवर काम करून सायंकाळी आपल्या दुचाकीने नरसाळा येथून सालेभट्टी येथे जात असताना गोविंद राजा कोटेक्स जवळ पिकचा टायर फुटल्यामुळे  पिकअपने त्याच्या दुचाकीला धडक दिली.

यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला.रस्त्याने येजा करणाऱ्या काही नागरिकांनी याची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.रवींद्रच्या पश्च्यात पत्नी आणि तीन मुली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर