ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भरधाव पिकपची दुचाकीला समोरासमोर धडक

4.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी

करंजी ते मारेगाव राज्य महामार्गावरील शिवणाळा फाट्याजवळील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

करंजी कडून मारेगाव कडे जात असलेल्या भरधाव पिकपने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराला समोरासमोर धडक दिली.यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्या तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना राज्य महामार्गावरील शिवणाळा फाट्याजवळ घडली. ही घटना आज दिनांक 23 ऑक्टोंबर 2024 रोज बुधवारला सायंकाळी 7:30 वाजताचे दरम्यान घडली.

रवींद्र रामकृष्ण अवताडे वय अंदाजे 35 वर्ष रा.खडकी ता.मारेगाव असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वार व्यक्तीचे नाव आहे.तर अतुल वसंतराव किनाके वय 28 वर्ष रा खडकी हा गंभीर जखमी झाला आहे.

रवींद्र याचे शेत मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील शिवणाळा फाट्यालागत आहे. रवींद्र आणि त्यांच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर अतुल हे दोघे शेतातील काम आटोपून सायंकाळच्या सुमारास खडकी येथे घराकडे जायला निघाले पण समोरून येणाऱ्या भरधाव पिकपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत रवींद्र याचा मृत्यू झाला असून अतुल याला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात होताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी लगेच मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.काही नागरिकांनी व पोलिसांनी जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी रवींद्र याला मृत घोषित केले.

तर अतुल हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.रवींद्र यांचे पश्चात पत्नी व दोन मुले सारंग वय 10 वर्ष व संघर्ष वय 6 वर्ष असा आप्त परिवार आहे.या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


रवींद्र याचा मोठा भाऊ समीर याचा पण अंदाजे 23 वर्षा पूर्वी करणवाडी फाट्या जवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता.दोन्ही भाऊ अपघातामध्ये गेल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर