ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

करणवाडी ते म्हैसदोडका रस्ता मोजतोय अखेरची घटका

102 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– रस्त्यात खड्याचे साम्राज्य खड्डे रस्त्यात की खड्यात रस्ता

– खड्या मुळे नागरिक भोगताहेत नरकयातना

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगांव तालुक्यातील करणवाडी,नवरगाव ते म्हैसदोडका, रोहपट या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आले नाही.त्या मुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे तयार झालेले आहे.या रस्त्यावर थोडीशी तात्पुरती अर्धवट करणवाडी बस स्टॉप पासून करणवाडी गावाबाहेरील स्मशानभुमी पर्यंत थातुत मातुर डागडुजी करण्यात आली.ते पण निकृष्ठ असल्याने उखडून खड्डे व गिट्टी चे साम्राज्य निर्माण झाले आहे.



तालुक्यातील करणवाडी ते नवरगाव,
हीवरी,अर्जुनी,सगणापुर,म्हैसदोडका,रोहपट सह हा रस्ता अनेक गावाला जाण्याकरिता एकमेव मार्ग असुन तो अखेरची घटका मोजत आहे.यावर्षी पडलेल्या अतिवृष्टीमुळे ह्या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की वाहन दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगांव अंतर्गत येत असलेल्या करणवाडी ते म्हैसदोडका,रोहपट रस्ता हा गेल्या अनेक वर्षां पासून तयार करण्यात आला नाही.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.या मार्गाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाला मोठी कसरत करत वाहन चालवताना दिसत आहे.

या मार्गावरील गावकरी नागरिकांना एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला तालुक्याच्या ठिकाणी नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.त्याच बरोबर नवरगाव या गावा पासुन काही अंतरावर असलेल्या नाल्यावरील पुलावर दीड – दीड फुटाचे खड्डे पडले आहे त्या खड्या मुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याच प्रमाणे बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागला आहे.हा रस्ता पूर्णपणे उखळुन रस्त्यात खड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.ह्या रस्त्या मुळे परीसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगांव अंतर्गत येत असुन या भागातील नागरिकांनी अनेक निवेदन आणि उपोषण सुद्धा रस्त्यांसाठी केल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी परीसरात नागरिकांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर