ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

महसूल विभागाची अवैध रेती तस्करावर कारवाई

150 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

डोलडोंगरगाव येथे ट्रॅक्टरवर कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील डोलडोंगरगाव येथे आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोज शुक्रवारला पहाटे ३ वाजता अवैध मार्गाने रेतीची तस्करी करीत असलेल्या ट्रॅक्टरवर मारेगाव महसूल विभागाने कारवाई केली त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मारेगाव तालुक्याला समृद्ध असा वर्धा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या वर्धा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर रेतीची तस्करी होत असते.आजपर्यँत अनेक रेती तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु रेतीची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.

अशातच आज पहाटे तीन वाजता डोलडोंगरगाव येथे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून रेती तस्कर ट्रॅक्टर व हायवा वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याने सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर होते.

आज पहाटे तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेला ट्रॅक्टर हे अवैध वाहन डोलडोंगरगाव येथे पकडण्यात आले.पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात येथे जमा करण्यात आल्याची माहिती आहे.ही कार्यवाही तहसीलदार निलावाड यांचे मार्गदर्शनात गुगाणे मंडळ अधिकारी मार्डी, तलाठी विवेश सोयम, कुडमेथे यांनी केली.

परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हाणूण पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार,मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर