ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वीज पडून 22 बकऱ्या ठार

6.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मजुराचे दिड लाखचे नुकसान

वरूड (नेत) येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

शेतामध्ये पडसाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या 22 नग बकऱ्यावर वीज कोसळली. यात 2 बोकड आणि 20 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मारेगाव तालुक्यातील वरूड (नेत) शेत शिवारात घडली. यात मजुराचे अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.

वरुड (नेत) येथील भारत तुकाराम गेडाम यांच्याकडे शेती नसल्याने ते बकऱ्या चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांनी आज दिनांक 18 मे 2025 रोज रविवारला दुपारी 3 वाजता आपल्या बकऱ्या गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात चारायला नेल्या होत्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले.

आणि वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली.पाऊसही लागला.त्यामुळे शेतातील बकऱ्यांनी घराचा रस्ता धरला.परंतु 2 बोकड आणि 20 बकऱ्या ह्या शेतामध्ये असलेल्या पडसाच्या झाडाखाली उभ्या राहील्या.अशातच वीज चमकली आणि पडसाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या या बकऱ्यावर पडली.यात 22 बकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने बकऱ्या चालणारे थोडे जखमी झाले असून त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अचानक घडलेल्या या घटनेने मजुरावर मोठे आर्थिक डोंगर कोसळले असून शासनाकडून मोठया मदतीची अपेक्षा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर