ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

2.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अर्जुन येथील जंगलातील घटना

मारेगाव तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची दहशत

सुरेश पाचभाई मारेगाव


मारेगाव तालुक्यात आणखी एकदा वाघाची दहशत पहावयास मिळत आहे.काल दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवारला दुपारच्या  सुमारास अर्जुनी येथिल मंगेश मनोहर तोडासे यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 11 वाजता उघडकीस आली.

मनोहर तोडासे यांची गाय काल दिनांक 12 नोव्हेंबरला 2024 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास अर्जुनी येथील जंगलात चराईसाठी गेली होती.पण सायंकाळ झाली तरी गाय परत न आल्या मुळे पशुधन पालक यांनी सायंकाळी शोधा-शोध केला पण गाईचा थांग पत्ता लागला नाही.सकाळी जंगलात जाऊन पाहणी केली असता गाईवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.

त्यांनी सदर घटनेची माहिती फॉरेस्ट ऑफिसला दिली.असुन त्यांच्या गाईची  किंमत अंदाजे 20 हजार रुपये असल्याचे बोलले जात आहे. या शेतकऱ्याला लवकरात लवकर प्रशासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

या परिसरामध्ये आणखी एकदा वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सध्या अर्जुनी व परिसरात शेतामध्ये कापूस वेचणीच्या कामाची लगभग सुरू आहे.त्यामुळे वाघ कुठेही दवा धरून बसून राहू शकतो.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर