ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी येथे संजय देरकर यांच्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ

198 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

झरी व मुकुटबन येथे प्रचार कार्यालयांचे थाटात उद्घाटन

तालुका प्रतिनिधी :- वणी

वणी:- महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु झाला आहे. शिवसैनीकांकडून संजय देरकर यांचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. मशाल हे चिन्ह गावागावात पोहचविण्याचं काम शिवसैनिक करीत आहेत.काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही संजय देरकर यांच्या प्रचारात उतरले आहेत. संजय देरकर यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

वणी व मारेगाव नंतर झरी जामणी तालुक्यातही संजय देरकर यांच्या प्रचार कार्यालयांचे थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, कॉमेड चे अँड दिलीप परचाके व काँग्रेसची जेष्ठ नेते मंडळी तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

6 नोव्हेंबरला खडकी येथील फार्म हाऊसवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर मुकुटबन येथील राजेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर झरी तालुक्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
दुपारी 12 वाजता मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खडकडोह येथील गणेश मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली.

सोबतच झमकोला शिवगड, शिबला चौफुली व माथार्जुन पाटण मार्गावरील देवीच्या मंदिरात पूजा केल्यानंतर संजय देरकर यांचा ताफा झरी येथे पोहचला. दुपारी 3 वाजता झरी येथील प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. पश्च्यात झरी जामणी येथील महाकाली मंदिरात पूजा करून झरी प्रचार शुभारंभ दौऱ्याचा समारोप करण्यात आला.


झरी प्रचार शुभारंभ दौऱ्यात माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह काँग्रेसचे नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी कडून संजय देरकर यांचा झंझावाती प्रचार करण्यात येत आहे.

शिवसेना व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते गावागावात जाऊन संजय देरकर यांचा सकारात्मक प्रचार करीत आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात मशाल पेटवायचीच हे उद्दिष्ट ठेऊन महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. संजय देरकर यांच्या प्रचार दौऱ्यांना जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर