ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

पहापळ येथे कृषी विभागाच्या योजनांवर मार्गदर्शन, महाविस्तार AI अ‍ॅपचा प्रचार

410 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे दिनांक ४ डिसेंबर २०२५, गुरुवारी कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत रब्बी हंगाम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गहू पिक शेतीशाळा, PFME योजना, फळबाग लागवड योजना, सुरक्षित फवारणी प्रत्यक्षिक अशा विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित महाविस्तार AI कृषी अ‍ॅप विषयी सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून त्याचा प्रचार व प्रसार करण्यात आला.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले, मंडळ कृषी अधिकारी किशोर डोंगरकर, माविमच्या सुचिता राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी महेश पाचपौर, गणेश कोल्हे, विवेक पारधी, विनायक जुमनाके, गौरी योगेश मडतापे आदी मान्यवर उपस्थित होते.

गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अधिकाऱ्यांनी रब्बी हंगामातील पिक व्यवस्थापन, हवामान बदलाचे परिणाम, उत्पादन खर्चात बचत, कीड-रोग नियंत्रणातील वैज्ञानिक उपाययोजना, तसेच फळबाग लागवडीतील नवीन संधी याबाबत सर्वंकष मार्गदर्शन केले.

तालुका कृषी विभाग, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरामुळे शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, कृषी योजना आणि नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर