ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा दमदार रूट मार्च

11 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कायदा-सुव्यवस्थेसाठी चोख बंदोबस्त

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : आगामी ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी मारेगाव पोलिसांनी मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट २०२६) शहरातून दमदार रूट मार्च काढला.

ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस उपनिरीक्षक रवी बोरकुले, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या शिस्तबद्ध संचलनामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर सुरक्षा व्यवस्थेचा ठसा उमटला.

सदर रूट मार्चला मारेगाव पोलीस स्टेशन परिसरातून सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोशिया मस्जिद चौक, कलाम चौक, जुनी वस्ती, नगरपंचायत चौक, मार्डी चौक आदी प्रमुख भागातून मार्गक्रमण करत पुन्हा मारेगाव पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

उत्सवाच्या काळात शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून, नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मारेगाव पोलिसांच्या या दमदार रूट मार्चमुळे शहरात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर