ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

हिवरीत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा उत्स्फूर्त मेळावा

7 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विविध स्पर्धांनी रंगला कार्यक्रम

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा हिवरी येथे महिलांचा उत्साहवर्धक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. इंदिरा ताई पीदुरकर या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर थेरे, युवराज अस्वले, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा कुडमिथे, कल्पना टेकाम तसेच सत्कारमूर्ती इंदुबाई कुळमेथे उपस्थित होत्या.

या निमित्ताने महिलांसाठी विविध मनोरंजक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची, ओंजळीने पाणी भरणे, बादलीत बॉल टाकणे अशा स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत आणली.

संगीत खुर्ची स्पर्धेत तब्बल 24 महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. छायाताई पिंपळकर यांनी पटकाविला. ओंजळीने पाणी भरणे स्पर्धेत कल्पना टेकाम यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर बादलीत बॉल टाकणे स्पर्धेत कुमारी श्रद्धा पाचभाई हिने प्रथम क्रमांक पटकावत उपस्थितांची दाद मिळवली.

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्कारमूर्ती इंदुताई कुडमिते यांना श्रीफळ व पातळ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. स्वप्नील नवघरे यांनी केले, तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री.अमोल वावरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानण्यात आले.
महिलांच्या मोठ्या उपस्थितीमुळे व उत्साहपूर्ण सहभागामुळे हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर