ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कृषि विभागाच्या पुढाकाराने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’चे शेतकरी प्रशिक्षण यशस्वी

337 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : तालुक्यात गटशेतीची संकल्पना रूजवून कृषि क्षेत्रात शाश्वत समृद्धी आणण्याच्या उद्देशाने कृषि विभाग आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ करिता शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पानी फाउंडेशनच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्त्व, गटबांधणीची आवश्यक प्रक्रिया आणि त्यातून साध्य होणारे सामूहिक फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकरी प्रतिनिधी बाळवंतराव झोटिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी सत्यमेव जयते फार्मर कपमधील कृषि विभागाची भूमिका उलगडत गटशेतीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रगतीबाबत शेतकऱ्यांना संबोधित केले. पानी फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक शुभम ठक यांनी व्हिडिओ व कृषि पोवाड्याच्या माध्यमातून गटशेतीची संकल्पना प्रभावीपणे मांडली.

यावेळी प्रशिक्षक राजू कांबळे यांनी गटबांधणीची प्रक्रिया व तिचे फायदे विशद केले. प्रशिक्षक रिता ठवकर यांनी गटबांधणी प्रक्रियेत महिलांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. तर दुर्गेश गुरनुळे यांनी गटशेतीतून पानी फाउंडेशनच्या सहकार्याने समृद्धीकडे वाटचाल कशी शक्य होते हे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी केले. महाविस्तार ए-आय अॅपचा वापर व त्याचे फायदे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले.

तालुक्यातील सर्व सहायक कृषि अधिकारी, उपकृषी अधिकारी, कृषि ताई व कृषि सखी यांच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणास दीडशेहून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभून कार्यक्रम यशस्वी झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर