ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अतिदयनीय रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पाच गावांचा सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार जाहीर

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव :तालुक्यातील करणवाडी, नवरगाव, हिवरी, सगणापूर आणि म्हैसदोडका या पंचक्रोशीतील गावांनी अतिदयनीय रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार जाहीर केला आहे. अर्जुनी, गोधनी, रायपूर आणि रोहपट या ग्रामस्थांनीही या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे कळते.

ग्रामस्थांच्या वतीने मारेगावच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, धुळीमुळे वाढणारे श्वसनाचे आजार आणि वारंवार घडणारे अपघात तसेच रस्त्याचे रुंदीकरण-नूतनीकरण वर्षानुवर्षे न झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाला अनेक निवेदनपत्रे दिली असून शांततापूर्ण उपोषणे व आंदोलने केली होती. मात्र तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

“आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आम्हाला मतदान बहिष्कार हा शेवटचा मार्ग स्वीकारावा लागत आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या निवेदनाची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनाही पाठवण्यात आली आहे.

गावनिहाय नागरिकांच्या स्वाक्षरींची यादीही प्रशासनाला सोपवण्यात आली आहे.सदर प्रकरणाची प्रशासन कोणत्या स्तरावर दखल घेते याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर