ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई – धीरेंद्र शास्त्री भेटीवरील टीका फेटाळली

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव हल्ली प्रसिद्धीसाठीच काहीतरी बोलतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेली टीका धुडकावून लावली आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी या प्रकरणी त्यांच्यावर तिखट हल्ला चढवत त्यांना यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेण्याचा सल्ला दिला होता. पत्रकारांनी याविषयी धुळे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी श्याम मानव सध्या प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात असे सांगत त्यांचा समाचार घेतला. श्याम मानव थोडीच सर्टिफिकेट वाटणारे आहेत भूषण गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ नये असे सांगणारे श्याम मानव कोण आहेत? ते थोडीच सर्टिफिकेट वाटणारे आहेत? श्याम मानव अलिकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे प्रसिद्धी मिळावी म्हणून ते रोज अशी विधाने करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. काय म्हणाले होते श्याम मानव? अंनिसची बुवाबाजीविरोधात प्रबोधन सभा शनिवारी अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडली. तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्याम मानव यांनी भूषण गवई यांच्यावर निशाणा साधला. माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्री यांच्या पाया पडण्यास गेले. ते पाहून मला प्रचंड धक्का बसला. भूषण गवई म्हणतात की, मी आंबेडकरी विचारांचा आहे. आंबेडकरी विचारांचे मी दूध प्यायलो आहे. पण ते जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील, तर आता तुम्ही यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचे नाही. तो अधिकार तुम्ही गमावला आहे, असे ते म्हणाले. धीरेंद्र शास्त्रींचे शिवरायांवरही वादग्रस्त विधाने धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवरही वादग्रस्त विधान केले. ते शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना म्हणाले होते, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे. आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले. त्यांच्या या विधानावर आता प्रचंड राजकीय वाद होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर