ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

परवा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार का?:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात किती तथ्य? अमेरिकेतील एपस्टाइन फाईल प्रकरणाने उडवली खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिकेच्या संसदेत 19 डिसेंबर रोजी उघड होणाऱ्या बहुचर्चित ‘एपस्टाइन फाईल्स’मुळे जगभरात खळबळ उडणार असून, याचा मोठा परिणाम भारताच्या राजकारणावरही होणार आहे. या फाईल्समधील माहिती इतकी स्फोटक असेल की त्यामुळे देशाचा पंतप्रधान बदलला जाण्याची शक्यता असल्याचे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की, जेफ्री एपस्टाइन या व्यक्तीने जगातील अनेक बड्या असामींना अल्पवयीन मुली पुरवल्या होत्या. या प्रकरणाच्या फाईल्स आता अमेरिकन संसदेत खुल्या होणार आहेत. या यादीमध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांचा आणि बड्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय राजकारणात भूकंप होईल आणि त्यामुळेच देशाचा पंतप्रधान बदलला जाईल, असा तर्क चव्हाण यांनी मांडला आहे. आपण बोलत असलेली माहिती अमेरिकेच्या संसदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर कनेक्शन पंतप्रधान बदलल्यानंतर नागपूरशी संबंधित व्यक्ती या पदावर बसेल, या आपल्या जुन्या दाव्यावर चव्हाण आजही ठाम आहेत. मोदींचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, जेफ्री एपस्टाइनने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशयही चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारतातील काही राजकारण्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा अमेरिकेत सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामध्ये काही आजी माजी खासदार आहेत, यापेक्षा जास्त काही मी बोलणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. व्हीप आणि अणुऊर्जा विधेयकाचा संबंध भाजप खासदारांना 19 डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याबाबत बजावण्यात आलेला ‘व्हीप’ आणि या आंतरराष्ट्रीय प्रकरणाचा काही संबंध आहे का, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले की, 19 तारखेला सरकार काही महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्याच्या तयारीत आहे. यामध्ये अणुऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाशी संबंधित विधेयकाचाही समावेश आहे. त्यामुळे या व्हीपचा केवळ विधेयकांशी संबंध आहे की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, याबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या खळबळजनक दाव्यांचे समर्थन करताना चव्हाण यांनी पुन्हा एकदा अमेरिकन संसदेच्या नोंदींचा हवाला दिला. मी जो काही तर्क मांडत आहे किंवा बोलत आहे, ती सर्व माहिती आणि कागदपत्रे अमेरिकेच्या संसदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एकंदरीतच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे याचा आपण थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी एपस्टाइन फाईल प्रकरण काय आहे, हे समजून घेऊयात.. एपस्टाइन फाईल प्रकरण काय आहे? जगभरात गाजलेले ‘एपस्टाइन प्रकरण’ हे हाय-प्रोफाइल गुन्हेगारी, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे एक अत्यंत गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणाची सुरुवात 2005 मध्ये फ्लोरिडामध्ये झाली, जेव्हा एका 14 वर्षांच्या मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली. मसाजच्या बहाण्याने मुलीला जेफ्री एपस्टाइनच्या आलिशान बंगल्यावर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा हा गंभीर आरोप होता. या तक्रारीनंतर हळूहळू 50 हून अधिक पीडित मुलींनी धर्य करून पुढे येत आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली आणि एपस्टाइनचे प्रकरणाचे पितळ उघडे पडू लागले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, एपस्टाइनच्या मॅनहॅटन, पाम बीच व्हिला आणि ‘लिटल सेंट जेम्स’ या खासगी बेटावर हाय-प्रोफाइल पार्ट्यांचे आयोजन केले जात असे, ज्यात अनेक बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती असे. अल्पवयीन मुलींना या बेटावर आणण्यासाठी एपस्टाइनचे खासगी विमान ‘लोलिता एक्सप्रेस’ वापरले जाई. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनीही या विमानाने प्रवास केल्याचे म्हटले आहे. पैसे आणि दागिन्यांचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढण्यात एपस्टाइनची मैत्रीण घिसलेन मॅक्सवेल हिने मोठी भूमिका बजावली. विशेष म्हणजे, एपस्टाइनचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव इतका होता की, 2008 मध्ये दोषी ठरूनही त्याला अवघ्या 13 महिन्यांची शिक्षा झाली आणि 2009 मध्ये त्याची सुटकाही झाली. मात्र, 2019 मध्ये या प्रकरणाला पुन्हा वाचा फुटली, जेव्हा व्हर्जिनिया ग्रिफी हिने एपस्टाइनवर अत्याचाराचे गंभीर आरोप केले. त्यानंतर सुमारे 80 महिलांनी तक्रारी दाखल केल्याने 6 जुलै 2019 रोजी एपस्टाइनला पुन्हा अटक करण्यात आली. परंतु, खटला सुरू होण्यापूर्वीच 10 ऑगस्ट 2019 रोजी तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृत अहवालानुसार ही आत्महत्या असल्याचे म्हटले असले, तरी अनेक तज्ज्ञांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि एपस्टाइनची साथीदार घिसलेन मॅक्सवेल हिला मात्र 2020 मध्ये अटक करण्यात आली असून, तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का? ‘द हिंदू’ मधील एका वृत्तानुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एपस्टाइनच्या जुन्या ईमेल आणि कॅलेंडरमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव देखील समोर आले होते. या वृत्तानुसार, एपस्टाइन यांनी 19 सप्टेंबर 2014 रोजी व्हाईट हाऊसच्या कायदेशीर सल्लागार कॅथरीन रुमलर यांना एक ईमेल पाठवला. त्यावेळी पुरी संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि हवामान परिषदेसाठी न्यू यॉर्कमध्ये राजदूत होते. एपस्टाइनने ईमेलमध्ये लिहिले, ‘या आठवड्यात न्यू यॉर्कला कोण येत आहे? मी त्यांना भेटण्याचा किंवा एखादा कार्यक्रम करण्याचा विचार करत आहे.’ हरदीप पुरी यांचेही नाव यादीत होते. ईमेलच्या शेवटी लिहिले होते, ‘मुलींनो? सावधान, मी माझी जुनी वाईट सवय पुन्हा करणार आहे.’ अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने पुरी यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली. यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, ‘एपस्टाइन फक्त असे म्हणत होते की जगभरातील मोठे लोक न्यू यॉर्कमध्ये आहेत. त्यांचा पुरीशी थेट संबंध नव्हता.’ दरम्यान, जगातील सर्वात हाय-प्रोफाइल सेक्स स्कँडल ‘एपस्टाइन केस’शी संबंधित 92 फोटो प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी 3 फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आहेत. एका फोटोमध्ये ते अनेक मुलींनी वेढलेले दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ते कंडोमच्या पॅकेटवर दिसत आहेत. असे म्हटले जात आहे की 19 डिसेंबर रोजी एपस्टाइन केसशी संबंधित सर्व कागदपत्रे, ईमेल आणि फोटो प्रसिद्ध होऊ शकतात. त्यामुळे आता 19 तारखेला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले दावे खरे ठरतात का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर