ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य!:विक्रम काकडे की सुनील टिंगरे? अधिकृत उमेदवाराबाबत संभ्रम; निष्ठावंतांची खदखद

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून नवा राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. पक्षाकडून विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विक्रम काकडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आले आहे. दुसरीकडे, पक्षातील जुने आणि विश्वासू नेते म्हणून सुनील टिंगरे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच सुनील टिंगरे हे डमी अर्ज भरणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांनी अर्ज भरला तरी माघारीच्या दिवशी म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणातरी एकाचा फॉर्म मागे घेतला जाणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेते सुरेश घुले नाराज तसेच राष्ट्रवादी पक्षातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते तसेच नेते नाराज असल्याचे समोर येत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते व राज्याचे उपाध्यक्ष सुरेश घुले देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पक्षाने निर्णय घेतलेला आहे. आता दोन फॉर्म भरायला सांगितले असे दिसत आहे. पक्षात काम केलेले अनेक आहेत, 40-50 वर्ष काम करूनही उमेदवारी मिळत नसेल तर नाराजी होणारच. पक्षाने निर्णय घेतला आहे. ठीक आहे. 40 वर्ष मी अजितदादांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केले आहे. माझी अपेक्षा मी सुनेत्रा वहिनी आणि पार्थ दादांच्या कानावर घातली होती, सगळ्यात सीनियर मी आहे. मी तेवढे प्रचंड कामही केले आहे आणि मला उमेदवारी मिळाली पाहिजे असे मी त्यांच्या कानावर टाकले होते. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता- सुरेश घुले पुढे बोलताना सुरेश घुले म्हणाले, आजही मी पक्षासाठी किती काम करतो हे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. नवीन चेहऱ्याला का संधी दिली हे पक्षाला विचारावे लागेल. जेवढे उमेदवार बघितले, त्यातला सगळ्यात वरिष्ठ मी आहे. शेवटी मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि मी पक्षासोबत राहील. निश्चितपणे उमेदवारीसाठी सर्वात सीनियर मी होतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी 8 वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, 12 वर्षे झाली प्रदेशउपाध्यक्ष आहे. जिल्हा बँकेवर 20 वर्षे संचालक म्हणून काम करत आहे. साखर कारखान्याचा चेअरमन होतो, मार्केट कमिटीचा चेअरमन होतो. मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, यावेळी चेतन तुपे यांना एकूण गोंधळाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आत्ता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंधळ अजिबात नाही. कोणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात चालतो. आमच्या पक्षाचा जो आदेश येईल त्यानुसार सगळे होईल. अनेक लोक इच्छुक होते, अनेक लोक एबी फॉर्म भरत आहेत. मात्र सुनेत्रा पवार ज्यांना एबी फॉर्म देतील त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे तुपे यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर