ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

भाजपचा एकनाथ शिंदेंवर प्रचंड दबाव:आता ठाण्याच्या महापौर पदावरही सांगितला दावा; आमदार निरंजन डावखरे यांनी टाकला डाव

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? या मुद्यावरून भाजप व शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आता थेट शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याच्या महापौरपदावर दावा सांगितला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीमुळे शिंदे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बहुमत आहे. पण सत्ता राखण्यासाठी त्यांना भाजपची साथ महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्याच्या महापौर पदावर दावा सांगितला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले. पण आमचाही सन्मान झाला पाहिजे. भाजपने शीळ ते वडवली या पट्ट्यात अत्यंत प्रभावी कामगिरी केली. आमच्या वाट्याला ज्या जागा आल्या, तिथे आम्ही 100 टक्के स्ट्राईक रेट राखला. आता आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे ठाण्याचा महापौर भाजपचा असावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. ठाणे महापालिकेत भाजपला किमान 2 वर्षांसाठी महापौरपद मिळावे. अन्यथा आम्ही सत्तेत न राहता विरोधी बाकावर बसणे पसंत करू, असा इशारा निरंजन डावखरे यांनी दिला आहे. शिंदे गटाच्या मुंबईतील राजकीय दबावतंत्राला उत्तर म्हणून डावखरेंनी ठाण्यात हा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाकरे – फडणवीसांत दूरध्वनीवरून चर्चा दुसरीकडे, भाजपने मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्यावर ठाकरे गटाशी बोलणी सुरू केल्याचाही दावा केला जात आहे. शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. पण तूर्त भाजप आमदार प्रवीण दरेकर व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने 2017 साली ठाकरे गटाचा महापौर व्हावा म्हणून महापौरपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला होता. या मदतीची कथित परतफेड म्हणून ठाकरे गट यंदा महापौरपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहून भाजपची मदत करेल. पण भाजप व ठाकरे गटाने ही शक्यता फेटाळल्याने यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा दुसरीकडे, ठाकरे गटाने मुंबईच्या महापौरपदावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या दिवशी मुंबईत भाजपचा महापौर बसेल, त्या दिवशी संपूर्ण मुंबई शोकसागरात बुडेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत भाजपचा महापौर बसवण्यासंबंधी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. मोदींचे भाषण लिहिणाऱ्यांचा इतिहास कच्चा आहे. मुंबीत फक्त शिवसेना आहे व राहील. मुंबईकरांनी जे आकडे दिलेत, त्यावरून भाजपचा विजय झाला नसल्याचे स्पष्ट होते. मोदींनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. संजय राऊत यांनी यावेळी एकनाथ शिंदेंचा यांचा उल्लेख उपरोधिकपणे लोहपुरुष म्हणूनही केला. एकनाथ शिंदे हे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शहा त्यांना खांद्यावर घेऊन फिरतात, पण शिंदेंची चावी नक्की कुणाकडे आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर