ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन स्पर्धेत शिक्षक जगतापांची राज्यस्तरावर निवड:संगमनेरात झाली विभागीय स्पर्धा, मुंबईत होणार राज्य स्पर्धा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संगमनेर येथे झालेल्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेतून शेवगाव तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक युवराज जगताप यांची राज्यस्तरावर निवड झाली. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाच्या वतीने विभागीय स्तरीय स्पर्धा संगमनेर येथे झाली. या स्पर्धेत शिक्षक युवराज जगताप यांनी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन यात भाग घेतला. त्यात त्यांनी सुमारे २००० शब्दांचा अहवाल, १२ पानांचे प्रेझेंटेशन सादर केले, तसेच करिअर निवडताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरावर निवड झाली. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डायटमधील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यात शैक्षणिक प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे त्यांच्यात समन्वय सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येत आहे.या स्पर्धेच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. ही स्पर्धा ४३ विषयांवर आधारित असते. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे विषय दिले जातात. या निवडीबद्दल शिक्षक जगताप यांचे शेवगाव तालुका गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ व बालानंद परिवारातर्फे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर