ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणा’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी:असे धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य, मंत्री आशिष शेलारांची माहिती

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला’ नुकतीच मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने राज्याच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने हे धोरण तयार केले आहे. अशा प्रकारचे सर्वंकष धोरण मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, या माध्यमातून राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाला मोठी चालना मिळणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. या धोरणाचा मुख्य उद्देश अत्यंत दुर्गम, आव्हानात्मक आणि अत्यावश्यक क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित कार्यप्रणालीचा प्रभावी वापर वाढवणे हा आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वयंचलित एअर व्हेईकल्स (ड्रोन्स), ग्राउंड व्हेईकल्स आणि अंडरवॉटर व्हेईकल्स या जागतिक स्तरावर प्रचंड विकासाच्या संधी असलेल्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, या महत्त्वाकांक्षी धोरणामुळे राज्यात सुमारे 25 हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येण्याची अपेक्षा असून तब्बल 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच, या तंत्रज्ञानाच्या संशोधनाला आणि विकासाला गती देण्यासाठी राज्यभरात तीन उत्कृष्टता केंद्रे देखील स्थापन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणातील प्रमुख मुद्दे •स्वयंचलित एअर सिस्टिम्ससाठी एक उत्कृष्टता केंद्र.
•स्वयंचलित ग्राउंड सिस्टिम्ससाठी एक उत्कृष्टता केंद्र.
•स्वयंचलित अंडरवॉटर सिस्टिम्ससाठी एक उत्कृष्टता केंद्र.
महाराष्ट्र स्वयंचलित अनमॅन्ड प्रणाली धोरण – प्रमुख मुद्दे.
•पुढील 5 वर्षांत 5000 प्रशिक्षित रिमोट पायलट्स तयार करण्याचे लक्ष्य.
•स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिक अनमॅन्ड प्रणाली विकसित करण्यास चालना.
•उद्योगांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध आर्थिक सवलती आणि प्रोत्साहन योजना.
•एकूण 2000 कोटींच्या मर्यादेत स्थिर भांडवली गुंतवणुकीवर 20 टक्के, 15 टक्के आणि 10 टक्के पर्यंत अनुदान.
•उत्पादन, चाचणी, क्षमता विकास, कौशल्य विकास, तंत्रज्ञान विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी विशेष प्रोत्साहन.
•उद्योगांना वीज दरांमध्ये सवलत, SGST परतावा आणि मुद्रांक शुल्कात अनुदान.
•अत्याधुनिक टेस्टिंग फॅसिलिटीज उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य.
•मनुष्यबळ प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी विशेष अनुदान.
•पेटंट नोंदणीसाठी भरीव आर्थिक मदत उपलब्ध.
•संशोधन व विकास क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वतंत्र अनुदानाची तरतूद.
•स्थानिक खरेदीला प्राधान्य देऊन राज्यातील आर्थिक व्यवहारांना गती.
•उद्योगांना स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य.
•उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रणी राज्य म्हणून नवी ओळख मिळणार.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर