ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

आता बदलत्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याची गरज:कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे प्रतिपादन, विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हवामान बदलाचा विपरीत परिणाम विविध पिकांवर होत आहे. यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अजुनही काही भागात जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत विविध पिकातील उशिरा तयार होणाऱ्या वाणांची गरज निर्माण झाली आहे. यासाठी बदलत्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या वाणांची निर्मिती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक रब्बी व उन्हाळी-,२०२५ चे आयोजन हायब्रीड मोडमध्ये करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर, पुणे विभागीय कृषि सहसंचालक यांचे प्रतिनिधी म्हणुन कृषि अधिकारी राऊत व श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गोसावी उपस्थित होते. कुलगुरु डॉ. खर्चे म्हणाले, विद्यापीठात होणाऱ्या खरीप दिन, रब्बी दिन अशा कार्यक्रमामध्ये कृषि विभागाने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आणून विद्यापीठाचे संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन या बैठकीतील प्रत्याभरणाच्या प्रश्नांवर विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरता येईल. विद्यापीठात कृषि विभागाच्या मदतीने वर्षभर एकत्र येवून काम करु व शेतकरी बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया. डॉ. गोरक्ष ससाणे प्रास्ताविक करतांना म्हणाले, कृषि विभागाच्या अधिकाऱ्यानी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जवळच्या कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधन अहवालाचे सादरीकरण केले. डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले, पाऊस लांबल्यामुळे पेरण्यासुध्दा लांबल्या. जमिनीतील ओलाव्यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भात वाढेल. यावेळी शेतकऱ्यांनी विद्यापीठ प्रसारित करत असलेल्या सल्ला व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन रोग व किडींचे निर्मुलन करावे. विद्यापीठातील शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरेल पारंपरिक पध्दतीने शेती करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. हवामानाचा विपरित परिणाम जमिनीवर होत आहे. अशा जमिनीत निविष्ठा वापरण्यासाठीचे पोषक वातावरण नसते. परिणामी पिकांची उत्पादकता कमी होते. यासाठी विद्यापीठातील हवामान अद्ययावत काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरेल. हे तंत्रज्ञान गाव, तालुका व जिल्हा पातळीवर विस्तार यंत्रणांच्या माध्यमातून पोहोचायला हवे. काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान वापरले तर निविष्ठा कमी लागतील व परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल,असे कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर