ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रा. डॉ. संतोष डाखरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव : तालुक्यातील मांगरुळ येथील सुपुत्र, राजकीय विश्लेषक व साहित्यिक प्रा. डॉ. संतोष डाखरे यांच्या ‘राजकीय नेतृत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.

प्रा. डॉ. संतोष डाखरे हे मागील पंधरा वर्षांपासून भामरागड येथील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांमधून ते आंतरराष्ट्रीय विषयांवर सातत्याने लेखन करीत असून त्यांचे शैक्षणिक व वैचारिक योगदान उल्लेखनीय आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले असून त्यांची काही पुस्तके विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत.या प्रसंगी वणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उ. बा. ठा.) आमदार संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुस्तकाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ‘राजकीय नेतृत्व’ हे पुस्तक राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तसेच सध्या कार्यरत असलेल्या व्यक्तींना निश्चितच दिशादर्शक ठरेल.कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर