ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

संजय राऊत यांचा आणखी एक भाऊ निवडणूक रिंगणात:BMC लढवणार? आमदार भावाच्या मतदार संघातून आजमावणार नशीब

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप उर्फ अप्पा राऊतही यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी आपले मोठे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील विक्रोळीतील एका वॉर्डातून आपले नशीब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे. पण या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दावा ठोकला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी शरद पवार गटाच्या आग्रहावरच अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी या आघाड्यांमधील घटकपक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. यामुळे निवडणुकीत रंगत आली असताना संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप राऊत बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. विक्रोळीतील वॉर्डातून निवडणूक लढवणार यासंबंधीच्या माहितीनुसार, संदीप राऊत हे आपले बंधू आमदार सुनील राऊत यांच्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील 111 नंबरच्या वॉर्डातून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. पण ते ज्या वॉर्डासाठी इच्छुक आहेत, तिथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा केला आहे. यामुळे पेच निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारीच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शरद पवार गट या जागेवरून माघार घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 111 मध्ये शरद पवार गटाचे धनंजय पिसाळ इच्छुक विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 111 मध्ये ठाकरे व शरद पवार गटात वाद सुरू आहे. या वॉर्डातून यापूर्वी राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ निवडून आले होते. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच राहावी अशी शरद पवार गटाची इच्छा आहे. पण ठाकरे गट या प्रकरणी संदीप राऊत यांच्यासाठी जोर लावत आहे. मुंबई निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती झाली नाही, तर या जागेवरून संदीप राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे जवळपास फायनल झाले आहे. शरद पवार गटाशी सकारात्मक चर्चा – राऊत दुसरीकडे, संजय राऊत यांनी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला आहे. आमची शरद पवारांच्या पक्षाशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांना ज्या जागा हव्या होत्या, त्यातील बहुतेक जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या आघाडीत सध्या तरी काही अडचण दिसत नाही. आम्ही त्यांचे समाधान केले आहे. शरद पवारांचा पक्ष आमच्यासोबत असावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना आमच्या वाट्याच्या जागा दिल्या आहेत. आमचे नुकसान झाले, पण ठीक आहे. आमचे लोक नाराज झालेत. पण युतीमध्ये हे सर्वकाही चालते. यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना संदीप राऊत यांच्या उमेदवारीविषयी विचारणा केली. त्यावर संजय राऊत यांनी आपल्याला याची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. संदीप राऊत यांच्याविषयी मला काहीही माहिती नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामु्ळे संदीप राऊत निवडणूक लढवणार किंवा नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर