ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

माढा तालुक्यात 49,965 हे. खरिपाचे उद्दिष्ट:मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, सीना-माढा उपसा सिंचनामुळे रब्बीचा तालुका खरिपाकडे वळला‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कुर्डुवाडी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, शेतांची नांगरणी आणि मान्सूनपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. बळीराजा सध्या पेरणीयोग्य पावसाची चातकासारखी वाट पाहत असून, पाऊस पडताच प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, कृषी विभागानेही यंदाच्या हंगामासाठी चोख नियोजन केले असून, तालुक्यात यंदा ४९ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माढा तालुका हा एकेकाळी प्रामुख्याने ‘रब्बीचा तालुका’ म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत निसर्गाची बदलती साथ, उजनी धरण, भीमा व सीना नदी परिसर आणि ‘सीना-माढा उपसा सिंचन’ यासारख्या विविध जलसिंचन योजनांमुळे तालुक्यात पाण्याची उपलब्धता लक्षणीय वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा कल आता रब्बीसोबतच खरीप हंगामाकडेही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांनी छोटा ट्रॅक्टर व बैलजोड्यांच्या साहाय्याने शेते तयार ठेवून पेरणीची जोरदार तयारी केली आहे. गतवर्ष म्हणजेच २०२५-२६ च्या खरीप हंगामात तालुक्यात ३२ हजार ५८१ हेक्टर प्रस्तावित क्षेत्र असताना, प्रत्यक्षात तब्बल ५३ हजार ६५७ हेक्टरवर (१६० टक्के) विक्रमी पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने ४९ हजार ९६५ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी पाण्याच्या उपलब्धतेमुळे यात मोठी वाढ २.२९ लाख गोण्यांचा साठा उपलब्ध पीक हेक्टर तूर १४,००० मका १०,००० उडीद ९,००० मूग १,५०० बाजरी १५०० मंजूर खत मेट्रिक टन युरिया १०,२३० संयुक्त खते ८,७५० एसएसपी २,९५० डीएपी २,७६० एमओपी १,२०० ^तालुक्यातील युरिया, एसएसपी, एमओपी, डीएपी आणि संयुक्त खतांचा सुमारे २ लाख २९ हजार ७३९ गोण्यांचा साठा उपलब्ध आहे. बोराडे ( तालुका कृषी अधिकारी ) होऊन गेल्या वर्षीसारखाच पेरणीचा टक्का वाढेल, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात खतांची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. यंदा २५ हजार ९४० मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर झाले आहे. ३० एप्रिल अखेर तालुक्यात १२ हजार १७७ मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर