ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

RBI ची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस:गैरकारभाराचा ठपका; आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले कर्ज, नियमबाह्य कर्जमाफी आणि एकंदर गैरकारभारावर ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 ‘अ’ आणि 47 ‘अ’ अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली असून, या नोटीसमुळे सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेकडून नोटीस बजावल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक होत जोरदार हल्लाबोल केला आहे. या कारवाईचा संदर्भ देत त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला असून, जयंत पाटील यांच्याच नेतृत्वाखाली बँकेचा संपूर्ण कारभार अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि मनमानीपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आणला पाहिजे, त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सध्या सुरू असलेली नोकर भरतती बोगसगिरी पद्धतीने सुरू आहे. आरबीआयची नोटीस आणि नोकर भरतीचा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. लवकरच याचे परिणाम दिसतील, असेही पडळकर यांनी म्हटले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांना चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आलेले कर्ज, नियमबाह्य कर्जमाफी आणि एकंदर गैरकारभारावर ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आरबीआयच्या या कठोर कारवाईमुळे विद्यमान संचालक मंडळाच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी संचालक मंडळावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, बँकेच्या या मनमानी कारभाराला जबाबदार धरून तिथे तातडीने प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी आक्रमक मागणीही पडळकर यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर