ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त:आगारात 21 पैकी 4 ‘ई-शिवाई’ बस दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन, होणार आरामदायी प्रवास

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई शिवाई बसपैकी चार बसेस दाखल झाल्या असून सोमवारी ता. १ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते याबसेसच उदघाटन करण्यात आले. लांबपल्याच्या मार्गावर या बसेस धावणार असून याबसेस मुळे हिंगोलीकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व प्रदुषणमुक्त होणार आहे. राज्यात महामंडळाने पर्यावरण पुरक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगाराच्या मागणी नुसार प्रत्येक आगारासाठी बसेसचा पुरवठा केला जात आहे. हिंगोली आगारातून सोडल्या जाणाऱ्या लांबपल्य्ांच्या गाड्यांसाठी २१ बसेसची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार महामंडळाकडून पहिल्या टप्यात चार बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे उदघाटन व लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, जमादार अशोक धामणे, आगार व्यवस्थापक किशोर महाजन, स्थानकप्रमुख सुनिता गोरे, वाहतूक निरीक्षक फिरोज शेख उपस्थित होते. सदर बसेस केवळ दीड तासात शंभर टक्के चार्ज होत असून त्यानंतर ३०० किलो मिटर अंतरापर्यंत धावू शकते. या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार असल्याचे आगार व्यवस्थापक महाजन यांनी सांगितले. या बसेस हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर, हिंगोली ते नांदेड, हिंगोली ते अकोला, हिंगोली ते परळी तसेच हिंगोली ते रिसोड या मार्गावर धावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात बसेसच्या उपलब्धतेनुसार बसफेऱ्या सोडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमास दिगंबर दराडे, सचिन पारीख, वैभव वरवंटे, मुकेश ठोंबरे यांच्यासह ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी कसबे, संकेत पवार, सिद्धेश्वर केंद्रे, वलेकर, चौधरी यांच्यासह आगार व वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर