ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

यशवाडीची आपत्ती:दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार, त्याने‎ दर्शन सुरू ठेवले : संस्थानचे अध्यक्ष, 3 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मानवत तालुक्यातील यशवाडीत मंदिराच्या‎ गाभाऱ्याचे छत कोसळून शनिवारी ५‎ भाविकांचा मृत्यू झाला होता. या मंदिराच्या‎ बांधकामावेळी राजस्थानच्या कंत्राटदाराला ‎दर्शन बंद करण्याबाबत विचारणा करण्यात‎ आली होती. मात्र कंत्राटदाराने दर्शन बंद‎करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले ‎होते. त्यामुळे या दुर्घटनेस कंत्राटदार‎ जबाबदार आहे. प्रशासनाने चौकशी करून‎ दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी‎मागणी यशवाडी मंदिर संस्थानचे अध्यक्ष‎शिवेंद्र स्वामी यांनी केली. दरम्यान,‎प्रशासनाच्या वतीने ३ दिवस मंदिर बंद‎ठेवण्यात आले आहे.‎ यशवाडी येथे २० जून रोजी मंदिराच्या‎ गाभाऱ्याचे छत कोसळून ५ भाविक दगावले. ‎‎यात १८ जण जखमी आहेत. जखमींपैकी ‎‎एकाची प्रकृती गंभीर असल्याने नांदेड येथे ‎‎हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृतीही स्थिर ‎‎असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.‎मंदिर परिसरात १० पोलिसांचा बंदोबस्त ‎‎लावण्यात आला आहे.‎ ५ वर्षांपूर्वी कंत्राटदाराला दिले काम : मंदिराच्या‎बांधकामासाठी ५ वर्षांपूर्वी भाविकांकडून वर्गणी गोळा करून‎राजस्थानच्या कंत्राटदाराला काम देण्यात आले होते. कोरोनाच्या‎कालावधीत हे काम थांबले होते. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या‎कामासाठी मोठ्या प्रमाणात दगडी शिळा लागणार, या मंदिराला शिळांची‎कमतरता भासत होती. त्यामुळे मंदिराच्या कामाची गती मंदावली होती.‎मात्र गेल्या दीड वर्षांपासून मंदिराचे काम सुरू करण्यात आले होते.‎ चौकशीनंतर गुन्हे दाखल होणार‎
रविवारी परभणीतील पुरातत्व विभाग व बांधकाम‎विभागातील अभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊन‎पाहणी केली. तसेच मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट‎करण्यासाठी पुणे व छत्रपती संभाजीनगर येथील‎पथकांना बोलावले आहे. २२ जून रोजी ही पथके‎यशवाडी येथील मंदिरात येणार आहेत.‎प्रशासनाच्या वतीने या दुर्घटनेची सखोल चौकशी‎करण्यात येणार आहे. त्यानंतर दुर्घटनेसाठी‎जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल होईल.‎ यशवाडी येथील मंदिराभोवती तारेचे कुंपण करण्यात आले आहे. इनसाइड स्टोरी: मंदिरासाठी १.७ कोटींचे कंत्राट‎
१ कोटी ७ लाख ६ हजार रुपयांना मंदिराच्या कामाचे‎कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी २१ लाख‎रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. तर‎उर्वरीत रक्कम टप्प्याटप्प्याने दिले जाणार होते.‎राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी‎दर्शनासाठी येतात. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने‎मंदिराच्या कामाला भरीव मदत मिळत आहे.‎
‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर