ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अजित पवार पुण्यात करणार काँग्रेसशी आघाडी?:सतेज पाटलांशी फोनवरून साधला संवाद; भाजपला कोंडीत पकडण्याचा टाकणार डाव

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

त्यात उभय नेत्यांत संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आता काँग्रेसपुढे मैत्रिचा हात पुढे करून भाजपशी दोनहात करण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. अजित पवारांचा सतेज पाटलांना फोन एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन केला आहे.

त्यात दोन्ही नेत्यांत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांची युती झाली तर या दोन्ही महापालिकांतील राजकीय समीकरण बदलून भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार व सतेज पाटलांतील चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

भाजपचा विजयी वारू रोखण्याचा प्रयत्न उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे भाजप आगामी काळात शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत सोबत ठेवेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. हाच धोका ओळखून अजित पवारांनी काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस जुने मित्र आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपचा विजयी वारू रोखता येईल, असे अजित पवारांनी सतेज पाटील यांना सांगितल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अजित पवारांनी पुण्यात शरद पवाराला सोबत घेण्याचीही चाचपणी सुरू केली आहे.

त्यातच आता त्यांना आपला जुना मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसची साथ मिळाली तर या तिन्ही पक्षांची ताकद भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. राष्ट्रवादी महायुतीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपचे राज्यभरात 117 नगराध्यक्ष निवडून आले. तर शिंदे गटाचे 53, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 37 नगराध्यक्ष निवडून आले.

अजित पवारांकडे राज्याचे अर्थखाते आहे. त्यामुळे तेच शहरी नगरपालिकांमध्ये विविध योजनांसाठी पैसे उपलब्ध करून देऊ शकतात असा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. पण त्यानंतरही राष्ट्रवादीला महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर