ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

‘चला कवितेच्या बनात’चा गौरव:उदगीरचे अनंत कदम यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदाचा रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार उदगीरचे अनंत कदम यांना जाहीर केल्याची माहिती, साहित्यिक सुरेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केलाय. साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक, संस्था किंवा व्यक्तीसाठी पाच हजार रुपये, ग्रंथभेट, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी कसलीही प्रवेशिका मागवली जात नाही. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. उदगीरचे अनंत कदम हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी वाचन चळवळीची गरज लक्षात घेऊन जून २०११ पासून ‘वाचक संवाद’ हा उपक्रम सुरू केला तो आजही समविचारी मित्रांना घेऊन अखंडपणे चालू आहे. आत्तापर्यंत ३५१ वक्त्यांनी त्यांच्या या उपक्रमात हजेरी लावलेली आहे. आतापर्यंत ३५१ पुस्तकांवर तितक्याच संवादकांनी ‘वाचक संवाद’मध्ये संवाद साधलेला आहे. ‘चला कवितेच्या बनात’ हा उपक्रमही ते राबवतात. या यशस्वी उपक्रमशीलतेमुळे त्यांची निवड केल्याचे सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. येत्या जानेवारीमधे त्यांच्या घरी जाऊन अनंत कदम यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराने अनंत कदम यांच्या कार्याची दखल घेतल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे या पुस्तकास मिळाला होता. सचिन पाटील यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. संबंधित वृत्त जिद्दी लेखकाचा सन्मान:सचिन पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे पुस्तकाला पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर