ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ऐन हंगामात शेतकऱ्याचे स्वप्न जळून खाक:७.५ लाखांचा ट्रॅक्टर आगीच्या भक्ष्यस्थानी, भंडारा जिल्ह्यातील घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील एका कष्टाळू शेतकऱ्यावर निसर्गाचा कोप नव्हे, तर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे. मोठ्या आशेने खरेदी केलेला ‘जॉन डिअर ५०३९’ हा ट्रॅक्टर अज्ञात कारणाने जळून खाक झाला असून, यात त्यांचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगेश मधुकर उरकुडे (४७) असे पिडीत ट्रँक्टर मालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गुरुवारी (१२ मार्च) सायंकाळपर्यंत कुडेगाव-गवराळा मार्गावरील शेतात गव्हाची काढणी जोमाने सुरू होती. हार्वेस्टरने काम आटोपल्यानंतर रात्र झाल्याने मंगेश यांनी आपला MH-33, AC-8635 क्रमांकाचा ट्रॅक्टर सुरक्षित समजून शेतातच उभा केला. मात्र, काळाच्या मनात काही वेगळेच होते. शुक्रवारी सकाळी जेव्हा मंगेश शेताकडे गेले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रभर धगधगणाऱ्या आगीत त्यांच्या कष्टाचे इंजिन पूर्णपणे कोळसा झाले होते. घातपात की तांत्रिक बिघाड? पोलिस घेणार सीसीटीव्हीची मदत ​या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. ही आग इंजिनमधील शॉर्ट सर्किटमुळे लागली की कोणी आकसापोटी लावली, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. लाखांदूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.लगावातील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, तांत्रिक तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.​ ​मागील वर्षीच साडेसात लाख रुपये खर्चून घेतलेला हा ट्रॅक्टर मंगेश यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. आता ऐन रोवणीच्या हंगामात ट्रॅक्टर जळाल्याने शेतीची कामे कशी करायची आणि झालेले मोठे कर्ज कसे फेडायचे, असा यक्ष प्रश्न या तरुण शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर