ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अहिल्यानगरात राष्ट्रवादीच्या 2 गटांत वाद:शरद पवार गटाच्या उमेदवाराला पिस्तूल दाखवत धमकी, पोलिसांची मदत घेतल्याचा आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर येथील एका उमेदवाराला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याची घटना घडली आहे. याकामी पोलिसांची मदत घेण्यात आल्याचा आरोप झाल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. सदर उमेदवाराने एका व्हिडिओद्वारे आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन करत न्यायाची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, रामदास विठ्ठल माने असे शरद पवार गटाच्या पीडित उमेदवाराचे नाव आहे. ते अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांवर पिस्तुल दाखवून धमकावल्याचा आरोप केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याची उजळणी करत आहेत. काय म्हणाले रामदास माने? रामदास माने आपल्या व्हिडिओत म्हणतात, मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक 1 मधून अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक लढवत असताना मला विविध अडथळे येत आहेत. माझ्या मागे प्रतिस्पर्धी पक्षांचे कार्यकर्ते येतात. गन दाखवतात. मागील 3 ते 4 दिवसांपासून मला गन दाखवणे, उमेदवारी अर्ज मागे घे म्हणून धमकावणे, माझ्या प्रचारात विविध अडथळे आणण्याचे प्रकार घडत आहेत. आज तर माझ्या प्रॉपर्टीमध्ये साधारणतः साडेतीन ते चारच्या आसपास 2 पोलिस व 2 अनोळखी माणसे गेट उघडून आत आले. त्यांनी रिव्हॉल्व्हर दाखवत आमच्याकडील बिहारी समाजाच्या कामगारांना धमकावले. त्यामुळे घाबरून सर्व कामगार फोन बंद करून निघून गेले. पोलिस पिस्तुल दाखवून धमकावत असतील तर हा लोकशाहीचा गळा आवळल्यासारखे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाने व्यक्त केला संताप दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रचारासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्या श्री सहाय्यकाने अंगरक्षकाचा व्हिडिओ शेअर केला होता. अहिल्यानगर येथील प्रभाग क्रमांक एक मधून उभे असणारे उमेदवार राम माने यांना रिवाल्वर चा धाक दाखवत संग्राम जगताप यांच्या लोकांनी कशी दहशत निर्माण केली त्याची ही आप बीती, असे त्यांनी माने यांचा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे. दरम्यान, अहिल्यानगर महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर