ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर असताना फलटणचा सुपुत्र शहीद:दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण सुदानमध्ये विकास गावडे यांना वीरमरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बरड (ता. फलटण) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यास आफ्रिकेतील दक्षिण सुदान या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. जवान गावडे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच फलटण तालुक्यासह त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. जवान विकास गावडे हे भारतीय लष्कारातील ११५ – इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नायक या पदावर सेवा बजावत होते. परदेशातील सैन्यांना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शांतीसेना असलेल्या मोहिमेत ते कार्यरत होते.त्यांची नियुक्ती सध्या आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेसाठी करण्यात आली होती.तिथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. जवान विकास गावडे हे बरड (ता. फलटण ) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते 22 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झाले.पुणे येथे त्यांनी सैन्य दलातील अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. ते भारतीय सैन्य दलात निष्ठेने सेवा बजावत होते.सध्या ते आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेत कार्यरत होते. संयुक्त राष्ट्राच्या “शांति सेनेमध्ये” कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. त्यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच फलटण तालुका व त्यांचे मूळगाव असलेल्या बरड येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ, पत्नी,दोन वर्षांची छोटी मुलगी असा परिवार आहे.त्यांचे पार्थिव उदया रविवारी (ता. 11) रोजी सकाळी त्यांच्या मूळ गावी येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर