ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नायलॉन मांज्या वापरास मनाई

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यात नायलॉन तसेच चायनीज मांजाचा वापर करू नये, असे कडक आवाहन पोलीस स्टेशन मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. सुरक्षित पतंगोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून नायलॉन मांजाला NO आणि सुरक्षिततेला YES म्हणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The Maregaon Police Station has issued a strict appeal against the use of nylon and Chinese kite strings in Maregaon taluka.  To celebrate a safe kite festival, every citizen is urged to recognize their responsibility and say NO to nylon kite strings and YES to safety.

नायलॉन व चायनीज मांजा अतिशय तीक्ष्ण व प्राणघातक असून यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच लहान मुलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होत आहे. याशिवाय पक्ष्यांच्या गळ्याला व पंखांना गंभीर इजा होऊन अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. नायलॉन मांजामुळे अपघात, गंभीर जखमा व जीवितहानीची अनेक प्रकरणे नोंदली गेली आहेत.

नायलॉन तसेच चायनीज मांजाची विक्री, साठवणूक, वाहतूक व वापर कायद्याने पूर्णतः बंद असून या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्याम वानखेडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन मारेगाव यांनी तालुक्यातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे व पर्यावरणपूरक, सुरक्षित पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर