ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कला वाणिज्य व विज्ञान क. महाविद्यालय मारेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगांव: कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे काल दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोज बुधवारला वर्ग 12 वि कला वाणिज्य, व विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर होते. व प्रमुख उपस्थिती प्रा.आवारी मॅडम प्रा.कुरेकर सर प्रा.मस्की मॅडम प्रा.बेतवार मॅडम प्रा. सातपुते मॅडम प्रा.चिंचुलकर सर प्रा.चोपणे सर प्रा. दानखेडे सर प्रा.प्रविण पोटे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषानातून संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात भीती न बाळगता परीक्षा शांत स्वरूपात देऊन जीवनात यशस्वी व्हा अधिकारी व्हा असा आशावाद व्यक्त केला.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी झाल्यावर तुम्ही विविध ठिकाणी काम करत असताना निष्ठेने काम केलं पाहिजेत, समाजाचा काही देण लागत हे लक्षात ठेऊन वागल पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांनी करिअर निवडत असताना आपली क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर कराव असा मुलमंत्र दिला व परीक्षे संदर्भात माहिती दिली.

तसेच प्रा.आवारी मॅडम प्रा.कुरेकर सर प्रा.मस्की मॅडम प्रा.बेतवार मॅडम प्रा.सातपुते मॅडम प्रा.पोटे सर यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व येणाऱ्या बारावीच्या परीक्षा संदर्भात माहिती दिली व तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या महाविद्यालयीन जीवनतील या दोन वर्षातील अनुभवाचे कथन केले, शिक्षका प्रती आदर व्यक्त केला.

या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चिंचुलकर सरांनी केलं व. प्रास्ताविक प्रा.कुरेकर सरांनी केले तसेच पाहुण्यांचे आभार प्रा.दानखेडे सरांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.चिंचुलकर सर,निलेश बेंडे सर,विकास ढोके व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी पार पडला .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर