ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

सर्व फाइल्स क्लियर, महत्त्वाच्या बैठका उरकल्या:शेवटच्या दिवशीही राज्याच्या आर्थिक उत्पन्न वाढीचा विचार; अखेरच्या प्रवासापूर्वी अजित पवारांनी काय केले?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे विमानाने येत होते, विमान बारामती विमानतळावर लँड होत असतानाच अवघे काही मिनिटांपूर्वी भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या विंनाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. आज बारामती येथे अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. परंतु, काळाने घात केला. अजित पवार हे काम करणारे नेता म्हणून ओळखले जायचे. सकाळी 6 पासूनच अजितदादा आपल्या कामाला सुरुवात करायचे. या अपघातापूर्वी देखील अजित पवारांनी अनेक मोठे निर्णय तसेच काम पूर्ण केल्याचे समोर आले आहे. मुंबईत अजित पवारांनी केलेल्या कामाचा तपशील समोर आला आहे. मुंबईत असले की अजित पवार सकाळी 8.30 वाजता मंत्रालयात येऊन कामकाजाला सुरुवात करायचे. तसेच काल देखील, म्हणजे मंगळवारी सकाळी 8.30 वाजता अजित पवार मंत्रालयात हजर होते. त्यांच्याकडे आलेल्या सर्व फाइल्स त्यांनी क्लियर केल्या. त्यानंतर वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, जीएसटी आयुक्त, एक्साइज आयुक्त यांच्या समवेत या आर्थिक वर्षात राज्याला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा त्यांनी घेतला. उत्पन्न वाढीच्या सूचना सर्व सचिवांना दिल्या. ही बैठक दीड तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठकीसंदर्भात चर्चा करून ते कॅबिनेट बैठकीला गेले. कॅबिनेट बैठकीनंतर ते पायाभूत सुविधा समिती बैठकीला देखील उपस्थित राहिले. त्यानंतर पुन्हा दालनात गेले. तिथे चंद्रकांत पाटील व त्यांची चर्चा झाली. हे आटोपून ते 2.30 वाजता देवगिरीकडे रवाना झाले. एकंदरीतच यातून हे लक्षात आले असेल की शेवटच्या दिवशी देखील राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी ते कार्यरत असल्याचे दिसून आले. अजित पवारांचे शेवटचे ट्विट अजित पवारांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाविषयी माहिती देणारे एक ट्विट देखील केले होते. 27 तारखेला दुपारी 3 वाजून 16 मिनिटांना त्यांनी ट्विट केले होते. हे ट्विट त्यांचे शेवटचे ट्विट ठरले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर