ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

ग्राम सुरक्षा दल अन् पोलिस मित्रांनी शांतता-सुरक्षिततेसाठी सक्रिय राहण्याची आवश्यकता:बार्शीत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मित्र व नागरिकांना दिल्या सूचना‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. गावातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेत पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. १७) बार्शी तालुका पोलिस ठाण्यात शांतता व पर्यावरण संवर्धनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी उत्सव, सण, बकरी ईद तसेच ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर प्रसारित होऊ नयेत याबाबत विशेष ताकीद देण्यात आली. कांही लोकांच्या संशयित हालचाली, भांडणतंटे, अवैध धंदे तसेच जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून तत्काळ पोलिस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, सहाय्यक फौजदार गवळी, पोलीस हवालदार दशरथ बोबडे, राजेंद्र मंगरुळे, रुपेश शेलार, धनराज केकाण, पोलिस कॉन्स्टेबल राहुल बोंदर, फॉरेन्सिक टीमचे सदस्य यांच्याबरोबर गावातील नागरिकही या कार्यक्रमाला मोठ्या संख्योने उ पस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर