Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

गिनीज बुक स्केटिंग रेकॉर्डधारक कु. मनस्वी पिपरे यांचे करंजी येथे भव्य स्वागत

सागर मुडे करंजी रोड प्रतिनिधी

गिनीज बुक स्केटिंग रेकॉर्डधारक कु. मनस्वी विशाल पिपरे हिने आपल्या उल्लेखनीय कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी स्केटिंगचे प्रयोग सादर करणाऱ्या मनस्वीने २४ जानेवारी रोजी पांढरकवडा ते वणी असा सुमारे ५० किलोमीटरचा स्केटिंग प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.

मनस्वीने सकाळी ७ वाजता पांढरकवडा येथून स्केटिंग प्रवासास सुरुवात केली. या प्रवासादरम्यान करंजी येथे तिचे आगमन होताच शेकडो ग्रामस्थ व करंजी पत्रकार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन तिचे जल्लोषात स्वागत व अभिनंदन करण्यात आले.कु.मनस्वी विशाल पिपरे ही मुळची बोटोनी, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून सध्या ती पुणे येथे वास्तव्यास आहे.

तिच्या या यशामागे गुरुवर्य प्रशिक्षक विजय मलजी यांचे मोलाचे मार्गदर्शन व अथक परिश्रम लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मनस्वीच्या जीवनात एक नवी पहाट उजळली असून महाराष्ट्राची एक अनोखी ओळख निर्माण झाली आहे.या उल्लेखनीय कामगिरीच्या निमित्ताने करंजी येथे शेकडो ग्रामस्थ व पत्रकार संघटनेच्या वतीने कु. मनस्वी पिपरे यांचे भव्य स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!