ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

न्यायालयात खटला प्रलंबित, तरी सत्ताधाऱ्यांकडून स्वागत कसे?:मराठी माणसांचा अपमान सहन केला जाणार नाही, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशाचे मुख्य न्यायधीश यांच्याकडे शिवसेना कुणाची हा खटला 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. ते स्वत: तारीख देतात आणि दोन महिन्यांनी तारीख पुढे ढकलतात. या काळात शिंदे गटाने
घटनाबाह्य पद्धतीने 4 निवडणूक लढवल्या आहेत. आता 21 तारखेचा तेच झाले. ते मुंबईत आले तर त्यांचे स्वागत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले. त्यांचा खटला सुरू असलेले लोकं त्यांचे स्वागत करत आहेत हे संविधानाविरोधातील आहे, हे अनैतिक आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, देशाच्या न्यायव्यवस्थेवर असलेला लोकांचा विश्वास उडून जाईल. का आम्हाला न्याय देण्यात येत नाही हे काल सिद्ध झाले आहे. ज्यांचा खटला सुरू आहे त्यांच्याकडून सत्कार कसा स्वीकारला जाऊ शकतो. पाटण्यात महाराष्ट्रभवनसाठी जागा मागावी संजय राऊत म्हणाले की, बिहारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी आव्हानाची भाषा केलेली आहे. संविधानानुसार हा देश सर्वांचा आहे. प्रत्येकाला देशामध्ये कुठेही फिरणे, राहणे नोकरी करणे हे सर्व अधिकार दिलेले आहे हे आम्हाला माहिती आहे. मुंबईमध्ये बिहार भवन त्यांना कशासाठी बांधायचे आहे. पाटण्याचा आणि बिहारचा विकास त्यांनी केला पाहिजे. पण मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त झालेली आहे, त्यामुळे त्यांना वाटते की इथे बिहार भवन उभारले पाहिजे. इतर राज्याची भवने मुंबई, नवी मुंबईत आहेत. मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी सरकारला त्यांना जागा द्यावी लागेल ना ती काही पाटण्याहून ते आणणार नाही. त्यासाठी सर्वपक्षांची एक बैठक घ्यावी लागेल, त्यात मुख्यमंत्र्यांनी सांगावे की मुंबईत बिहारभवनसाठी जागा देत आहोत. या बदल्यात त्यांनी बिहार सरकारकडे पाटण्यात 5 एकर जागा द्यावी तिथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मागणी करावी. मुंबईत जागा हवी असेल तर बाजारभावाने जागा घ्यावी. जर सरकारकडून हवी असेल तर पाटण्यात महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्यात यावी. मराठी माणसांचा अपमान करू नका संजय राऊत म्हणाले की, मुंबईची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. उगाच परिस्थिती बिघडेल अशी वक्तव्य कोणीही करू नये. गुलाबराव पाटील हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत त्यामुळे ते मराठी तरुणांबद्दल चुकीची भाषा वापरत आहेत. महाराष्ट्र जो घडवला आहे तो श्रमिक मराठी माणसांनी घडवला आहे. आज मुंबईमध्ये मराठी माणसाने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे मतदान केले आहे. आपल्या घामातून आणि रक्तातून त्यांनी मुंबई घडवली आहे. पण हे सर्वच नकली असल्याने त्याचे विचार सुद्धा नकली आहे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत. त्यांच्या पक्षाच्या राज्याचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांना मराठी तरुण आळशी आहे, काम करत नाही हे मान्य आहे का? हे त्यांनी सांगावे मग आम्ही उत्तर देऊ. मराठी माणसांचा अपमान करू नका. लोढांनी टॉवरचे नाव बदलावे संजय राऊत म्हणाले की, मंगलप्रभाग लोढा यांच्याशी दावोसमध्ये जात एक एमओयू साइन केलेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की मुंबईतील केम रुग्णालय आहे, कंग एडवर्ड हा शब्द काढावा, ही भूमिका चांगली आणि राष्ट्रवादाची आहे. पण लोढा हे जगातील सर्वात मोठे बिल्डर आहेत ते ट्रम्प यांचे भागीदार आहेत. लोढा यांनी ट्रम्प टॉवर नाव बदलावे, त्यांचे नाव त्यांनी मोदी, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती टॉवर करावे मग केमच्या विषयावर आम्ही चर्चा करू.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर