ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहते. सध्या वाढत्या तापमानामुळे विदर्भात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे आकांक्षा व तिच्या मैत्रिणींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वसतिगृहासाठी कुलरची मागणी केली. तिच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने तात्काळ कुलर उपलब्ध करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढल्याची माहिती आहे. याचा राग मनात धरून आता वसतिगृह प्रशासाने आकांक्षा उके हिलाच वसतिगृहातून हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे या गरीब विद्यार्थिनीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 6 महिन्यांचा निवास व भोजनाचा खर्च देण्याची ताकीद वसतिगृहाने आकांक्षा उके ही बाहेर नोकरी करते असा आरोप करत तिची हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच तिच्याकडून 6 महिन्यांचा निवास व भोजनाचा खर्चही जमा करण्याची ताकीद दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच गरीब विद्यार्थिनीसोबत होणारा हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याचा आरोपही केला आहे. लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा प्रकार विजय वडेट्टीवार म्हणाले, नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतकरी कुटुंबातील एका विद्यार्थिनीने उन्हाच्या तीव्रतेत कूलरची मूलभूत सुविधा मागितली आणि त्यासाठी थेट मुख्यमंत्री स्तरावर तक्रार केली, एवढंच तिचं “गुन्हा” ठरवलं गेलं का? त्यानंतरच तिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली, हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा आहे. वसतिगृहातील असुविधा मांडणे, प्रश्न विचारणे आणि न्याय मागणे यावर जर कारवाई होत असेल, तर ही प्रशासनाची चूक नाही तर उघड सूडबुद्धी आहे. “सावित्रीच्या लेकीला” तिच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होणे, हा केवळ विरोधाभास नाही तर व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत संपते. नागपूरमधील या संपूर्ण प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी व्हायलाच हवी आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा हा प्रकार व्यवस्थेच्या विश्वासाला मोठा धक्का देणारा ठरेल, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर