ब्रेकिंग न्यूज
⚡ Pandharpur: ‘5 मिनिटं थांबलो असतो तर माझाही जीव…’ विहीर दुर्घटनेतून कसा वाचला 16 वर्षांचा शुभम, सांगितला… ✦ ⚡ दिवाळीला मुलगी घरी आलेली, आईच्या फोनवर व्हिडिओ कॉल, पण संशय बळावला अन् अनर्थ टळला, नाशिकात खळबळ ✦ ⚡ पारंपरिक शेतीची वाट सोडली, बोर लागवडीचा केला यशस्वी प्रयोग, वर्षाला निव्वळ 6 लाख नफा, Video ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार…
SP News Maregaon

हिंगोलीत दिड लाखाच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर; हट्टा पोलिस ठाण्यात नोंद

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत तालुक्यातील गुंडा येथील तरुण शेतकऱ्याने नापीका व दिड लाख रुपये कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंडा येथील दत्ता दिगांबर चव्हाण (३२) यांना त्यांच्या वडिलांच्या नावे गुंडा शिवारात चार एकर शेत आहे. शेतात पारंपारीक पिके घेतली जातात. या शेतावर त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा जवळाबाजार येथून दिड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र मागील काही वर्षात सततची नापिकी यामुळे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दरम्यान, शेतात भुईमुग काढणीचे काम सुरु असल्याने रात्रीच्या वेळी ते शेतात गेले होते. मात्र सकाळपर्यंत ते घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. तसेच परिसरातील शेतात कामासाठी आलेल्या महिलांनी देखील त्यांच्या शेतात पाहणी केली असता दत्ता यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक शेख हकीम यांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी भागवत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दत्ता चव्हाण यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एकं मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर