ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी मैदानात:बारामतीत उमेदवारीवरून संघर्ष; महाविकास आघाडीत एकमताचा अभाव

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामतीसह राज्यातील दोन जागांवरील विधानसभेच्या पोटनिवडणुकांबाबत महाविकास आघाडीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान करत, शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही तर काँग्रेस त्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करेल, असे सांगितले आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या न लढण्याच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर महाविकास आघाडीत अधिकृत चर्चा अद्याप झालेली नसून, परस्पर चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बारामतीत निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तुतारीवर उमेदवार दिला नाही, तर आम्ही उमेदवार देऊ, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. बारामतीत राष्ट्रवादीमुळे काँग्रेस वाढली नाही, अशी नाराजीही उघडपणे व्यक्त करण्यात आली. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा युती करून काँग्रेसला अडचणीत टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर टीका करतानाच भाजपवरही निशाणा साधण्यात आला. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उमेदवार असतील, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे बारामतीत लढत कशी रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीत काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष याचदरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडत, आम्ही बारामतीची जागा लढवणार नाही. सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीचीही या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीतील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली असून, पुढील काही दिवसांत महाविकास आघाडीत काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर