ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

दाटेगाव शिवारात 263 झाडांना पाय फुटले?:टाटा पॉवरकडून झाडांची कत्तल, वन विभागाचा अहवाल; झाडे तोडली नसल्याचा कंपनीचा दावा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली तालुक्यातील दाटेगाव, लोहगाव भागात सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी टाटा पॉवर कंपनीकडून २६३ झाडांची विना परवानगी कत्तल केल्याचे वन विभागाच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर हि पाहणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे टाटा पॉवरने आम्ही झाडे तोडलीच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे झाडे तोडली कोणी हा संशोधनाची भाग झाला असून तुर्तास तरी २६३ झाडांना पाय फुटले काय? अशी विचारणा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हिंगोली तालुक्यातील दाटेगाव,लोहगाव परिसरात टाटा पॉवर कंपनीकडून १२०० एकर जमीन शेतकऱ्यांकडून २९ वर्षाच्या भाडेकरारावर घेण्यात आली आहे. या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले असून यातून निर्माण होणारी ऊर्जा विज कंपनीला दिला जात आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीकडून जमीनीचे सपाटीकरण करतांना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार शेतकरी सुनील माने यांनी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कृषी विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी माने यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. या संदर्भात माने यांनी वन विभागाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यानंतर वन विभागाने संबंधित कंपनीकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे लेखी उत्तर दिले होते. त्यानंतर विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्यासह १० कर्मचाऱ्यांच्या पथकाने मागील १५ दिवसांत प्रत्येक ठिकाणी जाऊन तोडलेल्या झाडांची पाहणी केली आहे. यामध्ये तब्बल २२४७ झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले. यामध्ये इतर झाडांना तोडण्याची परवानगीची गरज नसली तरी २६३ झाडांची तोडणी करतांना परवानगीची गरज होती. मात्र संबंधित कंपनीने तोडणीसाठी परवानगी घेतलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला असून आता टाटा पॉवर कंपनीवर काय कारवाई केली जाणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दंडाची नोटीस पाठविली जाणार – राजेंद्र नाळे, विभागीय वन अधिकारी हिंगोली संबंधित कंपनीने २६३ झाडांची तोडणी करण्यासाठी परवानगी आवश्‍यक असतांना वन विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे आता संबंधित कंपनीला प्रती झाड एक हजार रुपये या प्रमाणे दंडाची नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. आम्ही झाडे तोडलीच नाही – अविनाश राठोड, स्थानिक अधिकारी टाटा पॉवर कंपनी या भागात १२०० एकर नव्हे तर केवळ ७०० एकर जमीन शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. त्यापैकी ५५० एकरवर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी आम्ही झाडे तोडलीच नाही तर शेतकऱ्यांनीच झाडे तोडली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर