महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांनी १८ टक्के अपंगत्व असताना ५२ टक्के अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत लाभ घेतल्याची गंभीर तक्रार केंद्र सरकारकडे दाखल झाली आहे. या प्रकरणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. ‘दिव्य मराठी’ उघड केलेल्या या प्रकरणामुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी अखेर डॉ. अजय चंदनवाले यांनी मौन सोडून या प्रकरणाचे सारे आरोप फेटाळून लावलेत. डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी दिव्य मराठीने संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, ‘मला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या मंडळानेच हे प्रमाणपत्र दिल्याचे’ म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे त्यांची तीन स्तरावर चौकशी सुरू झालीय. एकीकडे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडून अॅक्शन टेकन रिपोर्ट मागितलाय. तर दुसरीकडे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटकडूनही कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. नेमके प्रकरण काय? बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याने नोकरी गमवावी लागलेल्या पूजा खेडकर यांचे प्रकरण नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे सध्या सुनावणीसाठी आहे. ते काहीसे शांत होत नाही तोच, खोटे-बनावट प्रमाणपत्र सादरीकरणातून शासकीय सेवेत दाखल होण्याचे प्रकरण थेट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंच्या रूपाने उघडकीस आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ. दिव्यांश द्विवेदी यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडे (पीएमओ) या संदर्भात तक्रार (नोंदणी क्र. PMOPG/E/2025/0202533) केली आहे. कारवाईची टांगती तलवार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांनी ५२ टक्के अपंगत्व असल्याचे भासवून दिव्यांग (पीडब्ल्यूडी) कोट्यातून वैद्यकीय शिक्षण आणि प्रशासकीय विभागात वरिष्ठ पदे मिळवली आहेत. मात्र, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीच्या तपासणीत त्यांचे प्रत्यक्ष अपंगत्व केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले असल्याचे म्हटले आहे. ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६’ नुसार, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किमान ४० टक्के अपंगत्व असणे अनिवार्य आहे. डॉ. अजय चंदनवाले यांचे अपंगत्व १८ टक्के आढळल्याने, त्यांनी घेतलेले सर्व लाभ कायदेशीररीत्या अवैध ठरण्याची शक्यता आहे. सोबतच डॉ. चंदनवाले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांचे पद सुद्धा धोक्यात येऊ शकते. तीन मणके झिजले- चंदनवाले दिव्य मराठीने या प्रकरणी डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी संपर्क साधला. सुरुवाती त्यांचा संपर्क झाला नाही. मात्र, त्यांची उशिरा पतिक्रिया मिळाली. ते म्हणाले की, ‘माझ्या मानेचे तीन मणके झिजले आहेत. उजवा खुबा व डाव्या हातात कमकुवतपणा आहे. जे प्रमाणपत्र दिले आहे, ते दिव्यांग व्यक्तींसाठी निर्माण केलेल्या मंडळाकडून मिळाले आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने तक्रारी केल्यास त्यांना कायद्यानुसार उत्तर देईन,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. तीन स्तरांवरून चौकशी सुरू १. केंद्र सरकार : कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणाच्या तक्रारीबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच सामाजिक न्याय मंत्रालयाचे सहायक विभाग अधिकारी सुशील कुमार यांनी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाला पत्र लिहून या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यास सांगितले आहे. २. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग : एनएमसीने देखील या तक्रारीची दखल घेतली असून, २६ डिसेंबर २०२५ रोजी या विषयावर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. ३. राज्य शासन : वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) प्रतिज्ञापत्र सादर केले असून, विभागातर्फे कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे समजते. पूर्णवेळच्या कुलगुरूंची प्रतीक्षा नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर या ऑक्टोबर २०२५ मध्ये निवृत्त झाल्या. त्यानंतर राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सोपविला आहे. मात्र, आता डॉ. चंदनवाले वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. तर विद्यापीठाला पूर्णवेळच्या कुलुगरूंची प्रतीक्षा आहे. MUHS विद्यापीठाचा व्याप मोठा देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना झाली. त्यानंतर अनेक आरोग्य विज्ञान महाविद्यालये जे पूर्वी परंपरागत विद्यापीठाशी संलग्न होते, ते म.आ.वि.वि.नाशिकच्या कार्यक्षेत्रात आले. विद्यापीठ स्थापन करताना 193 आरोग्य विज्ञान महाविद्यालये आणि एकूण 11995 विद्यार्थ्यांच्या जागासहित विद्यापीठाशी संलग्न झालेत. आरोग्य विज्ञान महाविद्यालयांची संलग्नता मेडिकल – 35 डेंटल – 28 आयुर्वेद – 62 युनानी – 06 होमिओपॅथी – 45 विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम Medical M.B.B.S. ( Bachelor of Medicine and Surgery) B.P.M.T. ( Bachelor of Paramedical Technology ) M.D. ( Doctor of Medicine) M.S. (Master of Surgery) D.M. (Doctor of Medicine) M.Ch. ( Magister of Chirugie) Dental B.D.S. ( Bachelor of Dental Surgery and Medicine) M.D.S. (Master of Dental Surgery) Ayurved B.A.M.S . (Bachelor of Ayurved Medicine Surgery) M.D. ( Doctor of Medicine) (Ayurved Vachaspati) M.S. ( Doctor of Surgery) (Ayurveda Dhanwantari) Unani B.U.M.S . (Bachelor of Unani Medical Medicine Surgery) M.D. ( Doctor of Medicine) (Mahir-E-Tib) M.S. ( Doctor of Surgery) (Mahir-E-Jarahat) Allied Health Sciences B.P.TH. ( Bachelor of Physiotherapy) M.P.Th. ( Master of Physiotherapy) BOP.TH. ( Bachelor of Occupational Therapy) M.O.Th. ( Master of Occupational Therapy) B.A.S.L.P. ( Bachelor in Audiology and Speech Language Pathology) B.SC. (H.L.S.) ( Bachelor of Science (Hearing, Language and Speech) M.A.S.L.P. ( Master of Audiology Speech and Language Pathology) B.P.O. ( Bachelor of Prosthetics) M.P.O. ( Master of Science (Prosthetics and Orthotics) B.SC. NURSING ( Bachelor of Science in Nursing) BASIC B.SC. NURSING ( Bachelor of Basic Science in Nursing) P.B.B.Sc . Nursing ( Post Basic B.Sc. Nursing) P.B.B.SC. NURSING ( Post Basic Certificate in Bachelor of Science in Nursing) P.C.B.SC. NURSING ( Post Certificate in Bachelor of Science in Nursing) M.Sc. Nursing (Medical Surgical Nursing) संबंधित वृत्त दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह-MUHS चे कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले वादात:बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत घेतला लाभ; ‘केंद्रा’ने मागवला महाराष्ट्राकडून अहवाल
MUHS च्या कुलगुरूंचे अपंगत्व 52 नव्हे 18 टक्के:डॉ. अजय चंदनवाले म्हणाले- मला दिव्यांग मंडळानेच प्रमाणपत्र दिले, मानेचे 3 मणके झिजलेत
-
By सुरेश पाचभाई
- January 30, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
पालकमंत्री झिरवाळांच्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम:हिंगोलीत त्यांच्या...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 27, 2026
तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही:कर्तव्यावर असताना...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 27, 2026
राज्यात लॉकडाऊन लागणार नाही:अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 27, 2026
हाय-प्रोफाईल लोकांसाठी निष्ठेचा बळी?:प्रियांका चतुर्वेदींची तुलना राऊतांशी...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 27, 2026
सोलापूर हादरलं! ट्रक-बाईकची भीषण धडक:दोन जणांचा जागीच...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 27, 2026
परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार:बदल्या, बेकायदेशीर वसुलीचे...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
