ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

भाजप म्हणजे विषारी साप, त्यांच्याशी ना दोस्ती बरी, ना दुश्मनी:न खाऊंगा म्हणणारेच सर्वाधिक खातात, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला. भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी आम्ही तर दुश्मनी करुण बसलो, ते कधीही नाग पाठवू शकतात, अस म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगपूर्वी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात पवारांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. टेंडरच्या माध्यमातून खाताय बच्चू कडू म्हणाले की, पूर्वी सिव्हिल सर्जनला असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असून, कमिशनसाठी औषधे महाग केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणारेच आज टेंडरच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार करत असल्याचे सांगत, त्यांनी एमआरइजीएसचे पैसे आणि दिव्यांगांच्या रखडलेल्या पगारावरून सरकारला धारेवर धरले. ज्या दिव्यांगांना दोन पाय नाहीत, त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आता आली आहे, असेही ते आक्रमकपणे म्हणाले. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पैसे काढले बच्चू कडू म्हणाले की, पंधराशे रुपये देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी, दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सरकार जनतेचे पैसे लुटत असल्याचे गणित त्यांनी मांडले. एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे ही सरकारची नीती आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, तर महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर