ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

लेखी आश्वासनानंतर सोलर प्लॅन्टविरोधातील उपोषण मागे

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अडेगाव येथील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी : अडेगाव येथील खंड क्रमांक १ मधील सर्वे नंबर ५१ येथे लोथा सोलर प्लॅन्टमुळे शेतात जाणाऱ्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश मिळाले आहे.

लोथा सोलर प्लॅन्ट व शेतकरी दिवाकर दादाजी काळे यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने २८ जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली.

या उपोषणाला विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांचा पाठींबा मिळाला.३० जानेवारी रोजी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश मॅकलवार तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र गेडाम यांनी तहसीलदार रासणे व पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना याची माहिती दिली.

त्यानंतर नायब तहसीलदार प्रितम राजगडकर यांनी तात्काळ कार्यवाही करत रस्ता अडविणाऱ्या संबंधितांचे बयान नोंदवले. तसेच सोलर प्लॅन्ट अधिकाऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून रस्ता बंद केल्याप्रकरणी दिवाकर दादाजी काळे यांना लेखी आदेश देत दोन दिवसांत रस्ता खुला करण्याचे निर्देश देण्यात आले.

शुक्रवारी रात्री ९ वाजल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने नायब तहसीलदार प्रितम राजगडकर, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, प्रकाश मॅकलवार, सुरेंद्र गेडाम, पटवारी बरशेट्टीवार मॅडम, बादल जाधव, राजू करमणकर, डॉ. मसीरकर, देवीदास पानघाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर